उपसरपंच पदी कुरंगळे बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपसरपंच पदी कुरंगळे बिनविरोध
उपसरपंच पदी कुरंगळे बिनविरोध

उपसरपंच पदी कुरंगळे बिनविरोध

sakal_logo
By

रसायनी, ता. २३ (बातमीदार) : रसायनीतील चांभार्ली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नंदकुमार कुरंगळे यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंच चित्रा मुंढे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. रिक्त उपसरपंच पदासाठी २२ ऑक्‍टोबर रोजी निवडणूक घेण्यात आली. उपसरपंच पदासाठी कुरंगळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात दुसरा उमेदवारी अर्ज दाखल नसल्यामुळे सभेच्या अध्यक्षा सरपंच बाली कातकरी यांनी कुरंगळे यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड जाहीर केली. सभेला ग्रामपंचायतीचे सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी मोहन शेलार उपस्थित होते. उपसरपंच कुरंगळे यांचे रायगड जिल्हा परिषद महिला आणि बाल कल्याण माजी सभापती उमाताई मुंढे, खालापूर तालुका पंचायत समिती माजी सदस्य दत्तात्रेय जांभळे आणि दिप्ती म्हात्रे, माजी सरपंच संदीप मुंढे राष्ट्रवादी काँग्रेसचे कैलास म्हात्रे आदींनी अभिनंदन केले आहे.

रसायनी ः उपसरपंचपदी नंदकुमार कुरंगळे यांची निवड करण्यात आली.