आश्रमातील मुलांना दिवाळीनिमित्त भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आश्रमातील मुलांना दिवाळीनिमित्त भेट
आश्रमातील मुलांना दिवाळीनिमित्त भेट

आश्रमातील मुलांना दिवाळीनिमित्त भेट

sakal_logo
By

रसायनी, ता. २७ (बातमीदार) : रसायनीतील पर्यावरण संवर्धनसाठी जागृती करणारी निसर्ग रक्षक संस्थाच्या वतीने खारघर येथील गिरीजा वेल्‍फेअर असोसिएशनच्या वृद्ध आणि अनाथ आश्रमातील मुलांना दिवाळीनिमित्त चॉकलेट आणि इतर वस्तूंचे वाटप करण्यात आले. ३५ विद्यार्थ्यांना चॉकलेट, बिस्कीट याशिवाय पेन्सिल, टॉवेल, ब्रश, कोलगेट, साबण तसेच आश्रमाला तांदूळ आणि डाळ आदी वस्तू देण्यात आल्या. या वेळी निसर्ग रक्षक संस्थेचे जान्हवी साळुंखे, शुभम शेंडगे, रवींद्र दोतोंडे, सचिन कुंभार आणि इतर उपस्थित होते. या उपक्रमासाठी भैरवनाथ किराणा ट्रेडर्स, कांबे यांचे विशेष सहकार्य लाभले.