कर्करोगच्या जागृतीसाठी आरोग्य शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्करोगच्या जागृतीसाठी आरोग्य शिबिर
कर्करोगच्या जागृतीसाठी आरोग्य शिबिर

कर्करोगच्या जागृतीसाठी आरोग्य शिबिर

sakal_logo
By

रसायनी, ता. ३० (बातमीदार) : रसायनीत मुंबई आँकोकेअर सेंटर पनवेल, रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा आणि पाताळगंगा रसायनी मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता. २९) रीस येथील गुड हेल्थ हॉस्पिटल येथे महिलांसाठी निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी डॉ. लेखा उचिल यांनी पुढाकार घेतला. उद्‍घाटनाप्रसंगी मुंबई आँकोकेअर सेंटर, पनवेलचे डॉक्टर प्रसन्न देशमुख, रोटरी अध्यक्ष अमित शहा, डॉक्टर लेखा उचिल, प्रकल्प संचालक समृद्व उचिल, संतोषजी राणा, विजय औटी, शिबिर समन्वयक विनय परब, स्नेहा पहुजानी, सोनाली कुडाळकर, जान्हवी म्हात्रे, लेखनिक उपस्थित होते. या वेळी डॉ. देशमुख यांनी कर्करोगाबद्दल माहिती देऊन लवकरात लवकर निदान करून घेण्याची आवश्यकता स्पष्ट केली. या स्तनांच्या आणि गर्भाशयाच्या कॅन्सरविषयक निदान शिबिराचा लाभ परिसरातील महिलांनी घेतला. या शिबिरात गुड हेल्थ हॉस्पिटलच्या सर्व कर्मचारी वर्गाने बहुमोल मदत केली. शिबिरात उपस्थित महिलांना स्तनांचा कर्करोग आणि स्वपरीक्षण याविषयी माहिती देणारे पत्रक देण्यात आले. रोटरीच्या सदस्या शारदा काळे, मेघा कोरडे, मितल शहा, अनुराधा होनावळेसुद्धा सदर शिबिरात उपस्थित होत्या.