वाशिवलीतील वीजखांब धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाशिवलीतील वीजखांब धोकादायक
वाशिवलीतील वीजखांब धोकादायक

वाशिवलीतील वीजखांब धोकादायक

sakal_logo
By

रसायनी, ता. ८ (बातमीदार)ः वडगाव ग्रामपंचायत क्षेत्रात वाशिवली येथे उच्च दाबाच्या वीज वाहिनीच्या मार्गातील एक खांब वाकला असून पडण्याच्या स्‍थितीत आहे. खांब पडल्‍यास मोठी दुर्घटना घडू शकते. त्‍यामुळे वीज महावितरण कंपनीने धोकादायक खांब त्‍वरित बदली करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
वीज महावितरणकडून वाशिवली येथून पाताळगंगा औद्योगिक क्षेत्र ते लोहोप या राज्य मार्गालगत उच्च दाबाच्या वीज वाहिन्या टाकण्यात आलेल्या आहे. काही दिवसांपूर्वी ट्रकने धडक दिल्‍याने वीज खांब वाकला असून धोकादायक स्‍थितीत आहे. याबाबत तक्रार करूनही महावितरणकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. वाकलेला खांब एका झाडाच्या आधारावर कसाबसा तग धरून उभा आहे. वादळी वारा-पावसात खांब कोणत्‍याही क्षणी कोसळण्याची भीती नागरिकांकडून व्यक्‍त होत आहे. त्‍यामुळे भविष्यातील मोठी दुर्घटना टाळण्यासाठी धोकादायक खांब बदली करावा, अशी मागणी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते एन. सी. पाटील यांनी केली आहे.

रसायनी ः वाशिवलीतील धोकादायक खांब कोसळण्याच्या स्‍थितीत आहे.