रसायनीत पेन्शन धारकांची नाराजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रसायनीत पेन्शन धारकांची नाराजी
रसायनीत पेन्शन धारकांची नाराजी

रसायनीत पेन्शन धारकांची नाराजी

sakal_logo
By

रसायनी, ता. १५ ( बातमीदार ) : दरवर्षी नोव्हेंबरमध्ये पेन्शनधारकांना हयात असल्‍याचा दाखल भरून द्यावा लागतो. मात्र रसायनी परिसरात दाखला भरून घेताना काही सेवा केंद्रात जास्त पैसे घेतले आहेत. त्‍यामुळे पेन्शनधारकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. रसायनी पाताळगंगा परिसरातील गावांत इपीएस ९५ पेन्शनधारकांची संख्या मोठी आहे. काही अंशी सरकारी पेन्शनधारक आहेत. बहुतेक पेन्शनधारक हयात असलेले दाखला ऑनलाईन सेवा केंद्रात भरण्यासाठी वासांबे-मोहोपाडा तसेच इतर ठिकाणी येतात, मात्र काही सेवा केंद्रात ५० तर काही ठिकाणी १०० रुपये घेतले जात असल्‍याचे पेन्शनधारकांनी सांगितले.