टाकाऊपासुन टिकाऊ वस्तूचे प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टाकाऊपासुन टिकाऊ वस्तूचे प्रदर्शन
टाकाऊपासुन टिकाऊ वस्तूचे प्रदर्शन

टाकाऊपासुन टिकाऊ वस्तूचे प्रदर्शन

sakal_logo
By

रसायनी, ता. २४ (बातमीदार) : रसायनीतील वासांबे मोहोपाडा येथील जनता विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये मंगळवारी (ता. २२) रोटरी क्लब ऑफ पाताळगंगातर्फे परिसरातील शाळांतील विद्यार्थ्यांनी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. परिसरातील नऊ शाळांतील एकूण ७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यातील उत्कृष्ट म्हणून निवड झालेल्या वस्तू पुणे येथील प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे. कार्यक्रमाला ग्रामसुधार मंडळाचे अध्यक्ष डॉ. पद्मनाथ पळणीटकर आणि सचिव तात्यासाहेब म्हसकर, प्रमुख पाहुणे म्हणून उद्‍घाटन सोहळ्यासाठी उपस्थित होते. प्रदर्शनाचे परीक्षण रवींद्र ओंकार, विनोद सहस्त्रबुद्धे, वसुधा सहस्त्रबुद्धे यांनी केले. कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा अध्यक्ष अमित शाह, माजी अध्यक्ष बाळकृष्ण होणावळे, सदस्य गणेश काळे, राजू गायकवाड, अनुराधा होणावळे उपस्थित होत्या. कार्यक्रम आयोजनासाठी जनता विद्यालय इंग्रजी माध्यम मुख्याध्यापक भीमराव वारे यांनी आणि इतर शिक्षकांनी विशेष सहकार्य केले.