Mon, Jan 30, 2023

दिव्या नायकची चमकदार कामगिरी
दिव्या नायकची चमकदार कामगिरी
Published on : 12 December 2022, 11:08 am
रसायनी (बातमीदार) : खेलो इंडियाअंतर्गत मुलींच्या १७ वर्षांखालील रायगड जिल्हा फुटबॉल संघाने पश्चिम विभागीय स्पर्धेत सहभागी होऊन उपविजेतेपद पटकावले. मुंबईतील कुलाबा येथील कुपरेज मैदानावर झालेल्या या स्पर्धेत नवीन पोसरी येथील दिव्या दुर्गादास नायक हिने जिल्हा संघातून चमकदार कामगिरी केली. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि मुंबई डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते विजेत्या संघांना गौरवण्यात आले. दिव्याने मिड फिल्डर म्हणून चांगला खेळ केला. फुटबॉल क्षेत्रात तिचे पदार्पण वयाच्या १० व्या वर्षी सेवन स्टार फुटबॉल अकॅडमी उरणमार्फत झाले. तेथून तिने फुटबॉल खेळाचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.