रसायनी परिसरात शिवजयंती उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रसायनी परिसरात शिवजयंती उत्साहात
रसायनी परिसरात शिवजयंती उत्साहात

रसायनी परिसरात शिवजयंती उत्साहात

sakal_logo
By

रसायनी (बातमीदार) : रसायनी परिसरात शुक्रवारी (ता. १०) चांभार्ली आणि इतर काही ठिकाणी तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. या वेळी शिवाजी महाराज आणि मावळ्यांची वेशभूषा केलेल्यांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले.
चांभार्ली नाक्यावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदीप मुंढे यांच्या हस्ते अभिषेक, पूजा आणि पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी संतोष पाटील, शिवदास जगताप, विजय चौधरी, संतोष मैदर्गीकर, धनाजी जांभळे, प्रतिक हिरवाळे, हेंमत मुंढे उपस्थित होते. सायंकाळी गावात शिवरायांची पारंपरिक पद्धतीने पालखीतून प्रदक्षिणा काढण्यात आली. या मिरवणुकीत अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे यांची वेशभूषा करून घोड्यावर स्वार झाले होते. सोहळ्यात महिला आणि बाल कल्याण माजी सभापती उमा मुंढे आणि दिव्या जांभळे सहभागी झाल्या होत्या. याशिवाय वडगाव, कैरे, वाशिवली, रीसवाडी आदी गावांत शिवजयंती साजरी करण्यात आली.