रोटरीतर्फे महिला पोलिसांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोटरीतर्फे महिला पोलिसांचा सन्मान
रोटरीतर्फे महिला पोलिसांचा सन्मान

रोटरीतर्फे महिला पोलिसांचा सन्मान

sakal_logo
By

रसायनी (बातमीदार) : रसायनीतील रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रसायनी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलिसांचा गौरव करण्यात आला. पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्वनाथ खेडकर, रोटरीचे अध्यक्ष अमित शाह, सचिव डॉ. धीरज जैन, माजी अध्यक्ष सुनील भोसले, दीपक चौधरी, शशिकांत शानबाग, देवेंद्र महिंद्रीकर, माजी अध्यक्ष ऋतुजा भोसले, मेघा कोरडे, प्रतीक्षा कुरंगले, एंजल सुंदर, ऍन स्विटी जैन, जयश्री पाटील, अंजली बोराडे, समिधा थोरात, डॉ. शीतल भगत, डॉ. सीमा पाईकराव, डॉ. प्रतिभा महिंद्रीकर, मित्तल शाह, पनवेल इनरव्हीलच्या सदस्या नीलम सोमाणी उपस्थित होत्या. या वेळी पोलिस ठाण्यातील प्रियांक कांबळे, मथुरा पथवे, सौ घरत यांचा सन्मान करण्यात आला.