श्री शिवलिंग प्राणप्रतिष्ठा सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्री शिवलिंग प्राणप्रतिष्ठा सोहळा
श्री शिवलिंग प्राणप्रतिष्ठा सोहळा

श्री शिवलिंग प्राणप्रतिष्ठा सोहळा

sakal_logo
By

रसायनी (बातमीदार) : वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायतीतील नवीन पोसरी येथील मंदिरात भगवान श्री नर्मदेश्वर शिवलिंग प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्‍साहात पार पडला. दोन दिवस सुरू असलेल्या धार्मिक सोहळ्याची सांगता सोमवारी हभप कृष्णा महाराज लांबे यांच्या कीर्तनाने झाली. यावेळी आयोजित धार्मिक कार्यक्रमांत परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती. रविवारी दुपारी प्रधान संकल्प, शरीरशुद्धी, ग्रामदेवता आवाहन, गणपती पूजन, आचार्य वरण, स्थलशुद्धी, प्रसाद वास्तू मंडल, ब्रम्हादी मंडल, नवग्रह मंडल आवाहन, मूर्ती नगर प्रदक्षिणा, अग्नी स्थापना असे कार्यक्रम झाले तर सोमवारी सकाळी देवता पूजन, हवन, बलीदान, वास्तू निक्षेप, पूर्णाहुती, षोडषउपचार पूजा, मंदिराचे लोकार्पण आदी असे कार्यक्रम झाले.

रसायनी ः