
वासांबे मोहोपाड्यात कार्यक्रमांची रेलचेल
रसायनी, ता. २५ (बातमीदार) : वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शनिवारी (ता. २२) अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर शिवनगर येथील श्री गणेश मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी श्री गणेश मंदिराच्या सुशोभीकरणासाठी सहकार्य करणाऱ्यांचा उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार मनोहर भोईर आणि माजी सरपंच संदीप मुंढे यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर जनसुविधा योजनेअंतर्गत भोईर यांच्या प्रयत्नातून शिवनगर येथे दहा लाख निधीअंतर्गत भव्य समाजमंदिराचे लोकार्पण आणि पाणीपुरवठा टाकी स्टँडचे उद्घाटन मनोहर भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. भोईर यांनी समाजमंदिराची पाहणी करत कामाचे कौतुक केले. या वेळी खालापूर तालुका उपसभापती गजानन मांडे, माजी सरपंच संदीप मुंढे, माजी उपसरपंच नंदकुमार कुरंगळे, मोहोपाडा शहर शाखाप्रमुख संतोष पांगत, शाखाप्रमुख मंगेश पाटील, योगेश खाने, चिक्या भोईर, सुरेश पाटील, अशोक म्हात्रे, चंद्रकांत राऊत, पांडुरंग राऊत, महादेव कोडीलकर उपस्थित होते.