Sun, Sept 24, 2023

मोबाईल नेटवर्कअभावी ग्राहकांची गैरसोय
मोबाईल नेटवर्कअभावी ग्राहकांची गैरसोय
Published on : 27 April 2023, 10:47 am
रसायनी (बातमीदार) : अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील चावणे पंचक्रोशीत मोबाईलला नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात विकास झपाट्याने होऊ लागला आहे. तसेच परिसरात घर, बांधकाम व्यावसायिकांचे गृहप्रकल्प उभे राहत आहे. त्यामुळे नागरिकांची वर्दळ वाढली आहे. असे असताना चावणे, सवने, जांभिवली परिसरात अनेक ठिकाणी मोबाईलला नेटवर्क मिळत नसल्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक परिसरात चावणे किंवा सवने गावाच्या हद्दीत मोबाईल टॉवर उभारण्यात यावा, अशी मागणी रमेश पाटील आणि इतरांनी केली आहे.