Wed, October 4, 2023

एकोणीस वर्षीय तरुण बेपत्ता
एकोणीस वर्षीय तरुण बेपत्ता
Published on : 24 May 2023, 11:57 am
रसायनी, ता. २४ (बातमीदार) : रसायनीतील सावळे येथून एकोणीस वर्षाचा तरुण हरवला आहे. हर्षल कैलास माळी असे त्याचे नाव आहे. रसायनी पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. कैलास यांचा मुलगा हर्षल पनवेल तालुक्यातील सावळा गावातून दुपारी दोनच्या सुमारास कामाला जातो, असे सांगून गेला. मात्र, त्यानंतर तो पुन्हा घरी परतलाच नाही. त्याचा आजूबाजूला आणि नातेवाईकांकडे शोध घेतला तरी तो सापडला नाही. अखेर रसायनी पोलीस ठाण्यात हरवलीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पाच फूट उंच असलेला हर्षल गहुवर्णीय आहे. २० दिवसांपासून हर्षल हरवल्याने त्याचे आई-वडील आणि कुटुंबीय काळजीत आहे. रसायनी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.