रखडलेल्‍या रस्‍त्‍याचे डांबरीकरण सुरू

रखडलेल्‍या रस्‍त्‍याचे डांबरीकरण सुरू

रसायनी, ता. २९ (बातमीदार) ः पाताळगंगा एमआयडीसीच्या क्षेत्रातील डांबरीकरणाचे काम काही दिवसांपासून रखडले होते. पावसाळाजवळ आल्‍याने हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी पाताळगंगा आणि रसायनी इंडस्ट्रीज असोसिएशनकडून करण्यात आली होती. त्‍यानुसार वासांबे-मोहोपेडा येथील कामगार वसाहतीत डांबरीकरणास रविवारपासून सुरुवात झाली आहे.
एमआयडीसीतील पाताळगंगा, अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्र तसेच वासांबे-मोहोपाडा येथील कामगार वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण झाले नाही तर वाहनचालकांची गैरसोय होईल, त्‍यामुळे रस्‍त्‍याचे काम पूर्ण करण्याची मागणी असोसिएशनकडून करण्यात आली होती.
रसायनी ः

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com