गडब येथे वाचनालयाचे उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडब येथे वाचनालयाचे उद्‍घाटन
गडब येथे वाचनालयाचे उद्‍घाटन

गडब येथे वाचनालयाचे उद्‍घाटन

sakal_logo
By

वडखळ, ता. ७ (बातमीदार) : आदर्श युवा संघटना गडब या संघटनेच्या वाचनालयाचे उद्‍घाटन एच. आर. जॉन्सन कंपनीचे जनरल मॅनेजर अरविंद जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.
वृत्तपत्राचे जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी वाचनालय होणे गरजेचे आहे. आदर्श युवा संघटनेचे कार्य महत्त्वपूर्ण आहे, असे एच. आर जॉन्सन कंपनीचे जनरल मॅनेजर अरविंद जोशी यांनी सांगितले. या वेळी संघटनेचे संचालक के. पी. पाटील, सदस्य चित्रकार प्रकाश पाटील, खगोल अभ्यासक प्रज्ञेश म्हात्रे यांचा सत्कार करण्यात आला. उद्‍घाटनप्रसंगी गडब सरपंच अर्पणा कोठेकर, उपसरपंच दर्शना पाटील, सदस्या सुवर्णा म्हात्रे, वडखळ सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र बेलदार, अध्यक्ष के. जी. म्हात्रे, उपाध्यक्ष तुलसीदास कोठेकर, सचिव कमलेश ठाकूर, दिनेश भोईर आदींसह संघटनेचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

वडखळ : आदर्श युवा संघटना गडब वाचनालयाच्या उद्‍घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवर.

Web Title: Todays Latest Marathi News Vdk22b00798 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top