बस-टेम्‍पोच्या धडकेत बसचालक ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बस-टेम्‍पोच्या धडकेत बसचालक ठार
बस-टेम्‍पोच्या धडकेत बसचालक ठार

बस-टेम्‍पोच्या धडकेत बसचालक ठार

sakal_logo
By

वडखळ, ता. ९ (बातमीदार) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गडब येथील ग्रीन पार्क हॉटेलजवळ खासगी बसचालक सुनीलकुमार राजेश्वर सिंह (५४) हा उभा होता. त्याच वेळी महाडकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. सुरेश कृष्णा जाधव (५०) हा छोटा हत्ती टेम्पोने महाडकडून मुंबईकडे जात होता. यादरम्यान गडब येथील ग्रीन पार्क हॉटेलजवळ सुनीलकुमार हे बसमधून उतरून रस्त्यावर उभे होते; मात्र भरधाव आलेल्या टेम्पोचालकाने दोन जणांना धडक दिली. यात सुनीलकुमार गंभीररीत्या जखमी झाले. त्यात त्यांचा मृत्यू झाला; तर दीपक पांडुरंग कदम हे जखमी झाले आहेत. याबाबत वडखळ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार देसाई अधिक तपास करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Vdk22b00800 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top