भुसंपादनाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भुसंपादनाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध
भुसंपादनाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध

भुसंपादनाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध

sakal_logo
By

वडखळ, ता. १२ (बातमीदार) ः महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पेण तालुक्यातील डोलवी औद्योगिक विकास क्षेत्रासाठी काराव-गडब, वडखळ-बोरी ग्रामपंचायत परिसरातील बेणेघाट, कोलवे, वावे, डोलवी, खारकारावी, काराव, खारमांचेळा, खारघाट या गावांतील जमीन संपादित करण्यात येणार आहे. या भूसंपादनाला येथील शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्‍यामुळे त्‍यांनी एकत्र येत मोजणीला विरोध केला आहे. या वेळी रायगड जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, पेण पंचायत समिती सदस्य प्रदीप म्हात्रे, नीलेश म्हात्रे आदीसह शेतकरी, महिला, शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रकल्पातील खारजांभेळा, खारचिर्बी, खारढोंबी या गावांतील जमिनी शासनाने भूसंपादनातून वगळण्याचा निर्णय घेतला असला तरी कोलवे, बेणेघाट, वावे, डोलवी, काराव, खारमांचेळा, खारकारावी या गावांतील जमिनी या प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणार आहेत. या संदर्भात जमीन मोजणीसाठी स्‍थानिक शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात आल्‍या होत्‍या, मात्र त्‍यांनी त्‍या स्‍वीकारल्‍या नाहीत. कोलवे येथे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मोजणीस विरोध केला. ज्या प्रमाणे तीन गावे वगळण्याचा निर्णय सरकारने घेतला, त्याचप्रमाणे सर्व गावे भूसंपादनातून वगळून प्रकल्पच शासनाने रद्द करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
भूसंपादनामुळे शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधन नष्ट होणार आहे. गावाच्या विस्तारासाठी जागाच शिल्लक राहणार नाही; तर अनेकांचा रोजगार जाणार आहे. त्यामुळे भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Vdk22b00801 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top