दादर सागरी पोलिसांची आरोग्य तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दादर सागरी पोलिसांची आरोग्य तपासणी
दादर सागरी पोलिसांची आरोग्य तपासणी

दादर सागरी पोलिसांची आरोग्य तपासणी

sakal_logo
By

वडखळ, ता. १९ (बातमीदार) : प्राथमिक आरोग्य केंद्र जिते अंतर्गत दादर सागरी पोलिस ठाण्यात जोहे येथे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले होते. यामध्ये सर्व पोलिस कर्मचाऱ्यांची आरोग्य व रक्त तपासणी करण्यात आली. रक्तदाब, मधुमेह, तोंडाचा कर्करोग, थॉयरॉईड, किडनी, लिव्हर टेस्ट तपासणी, सी.बी.सी या सर्व तपासण्या महालँबद्वारे करण्यात आल्या. या वेळी दादर सागरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गोविंदराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यू. बी. म्हात्रे, संतोष पांडुळे, विकास पाटील यांनी सहकार्य केले. या शिबिरात डॉ. दिक्षिता मोकल, डॉ. मिलिंद पाटील वैद्यकीय अधिकारी, डॉ. रोहिणी इंगळे, विकास पाटील, दिक्षिता मोकल, डॉ. रोहिनी इंगले, उदय म्हात्रे, मनीषा भोंडवे, लॅब टेक्नीशियन, सायली वाळेकर, आशा मोकल, संजीवनी मोकल-आशा स्वयंसेविकांनी तपासणी केली. प्राथमिक आरोग्य केंद्र जिते अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील एकूण ३० गावांमध्ये रक्त व आरोग्य तपासणी करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Vdk22b00820 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top