खारेपाटाचा घसा कोरडाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खारेपाटाचा घसा कोरडाच
खारेपाटाचा घसा कोरडाच

खारेपाटाचा घसा कोरडाच

sakal_logo
By

वडखळ, ता. २६ (बातमीदार)ः पेण तालुक्यातील पाणीपुरवठा करणारे शहापाडा धरण गाळाने भरले आहे. गेल्‍या कित्‍येक वर्षांत धरणातील गाळ न काढल्‍याने खारेपाटातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.
पेण तालुक्यात हेटवणे, शहापाडा, आंबेगाव अशी तीन तीन धरणे आहेत, मात्र तरी देखील तालुक्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. खारेपाटात हाकेच्या अंतरावर असलेल्या शहापाडा धरणातील पाणी डिसेंबरमध्येच संपते. धरणातील गाळ गेल्‍या १०-१२ वर्षांत काढण्यात आलेला नाही. त्‍यामुळे पाणीसाठवण क्षमता कमी झाल्‍याने परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी नेहमीच भटकंती करावी लागते.
धरणातील जलशुद्धीकरण प्रकल्‍पही नादुरुस्‍त आहे. लवकरात लवकर गाळ न काढल्‍यास धरणाचे तळे होण्यास वेळ लागणार नाही, अशी शक्‍यता स्‍थानिकांकडून व्यक्‍त होत आहे. खारेपाटाला शुद्ध, मुबलक व नियामित पाणीपुरवठा होण्यासाठी शहापाडा धरणातील गाळ काढणे, पाणी शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित होणे, सिडकोकडून होणारा पाणीपुरवठा तत्काळ सुरू करणे या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रांत कार्यालयासमोर खारेपाट संघटनेमार्फत काही दिवसांपूर्वी बेमुदत उपोषण केले होते. जून महिना संपत आला तरी अद्याप या भागात टँकरने पाणी देण्याची वेळ पाणीपुरवठा विभागावर आली आहे. त्यातच हेटवणे कालवा उपविभागाने काढलेल्या पत्रकानुसार, या भागाला सहा दिवसांतून एकदा म्हणजेच आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होणार असल्याने खारेपाटात पाणीबाणी निर्माण झाली आहे.

प्रस्‍ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
खारेपाटातील पाणीसमस्‍येवर तालुक्यातील पाणीपुरवठा अधिकाऱ्‍‌यांकडे विचारणा केली असता, दहा वर्षांपूर्वी शहापाडा धरणातील गाळ काढला होता. गाळ काढण्यासाठी गेल्या वर्षी नवीन प्रस्ताव पाठविला होता; परंतु अजूनपर्यंत त्‍यास मंजुरी मिळाली नसल्‍याचे सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Vdk22b00823 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..