Mon, August 8, 2022

ज्येष्ठांच्या स्मार्ट कार्ड नोंदणीकरणास मुदतवाढ
ज्येष्ठांच्या स्मार्ट कार्ड नोंदणीकरणास मुदतवाढ
Published on : 5 July 2022, 9:48 am
वडखळ, ता. ५ (बातमीदार)ः आषाढीनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून स्मार्ट कार्ड नोंदणीकरण व वितरणासाठी ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाद्वारे विद्यार्थी,ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, विविध पुरस्कारार्थी यांना स्मार्ट कार्ड देण्यात येतात. ज्येष्ठ नागरिकांचे स्मार्ट कार्ड नोंदणीकरण करण्याकरिता जवळच्या आगारात
आधार कार्ड, मतदान कार्ड/ पॅन कार्ड, आधारकार्डला लिंक असलेला मोबाईल फोन, नोंदणी शुल्क ५० रुपयांसह स्वत: हजर राहून संपर्क साधावा. जास्तीत-जास्त ज्येष्ठ नागरिकांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणीकरण करून घ्यावे, असे आवाहन राज्य परिवहन विभागाच्या रायगडमधील नियंत्रक अनघा बारटक्के यांनी केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Vdk22b00829 Txt Raigad
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..