पेण एज्युकेशनच्या प्राथमिक शाळेत दिंडी सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेण एज्युकेशनच्या प्राथमिक शाळेत दिंडी सोहळा
पेण एज्युकेशनच्या प्राथमिक शाळेत दिंडी सोहळा

पेण एज्युकेशनच्या प्राथमिक शाळेत दिंडी सोहळा

sakal_logo
By

वडखळ, ता. १० (बातमीदार) ः हातात भगव्या पताका घेऊन शाळेतील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त वारकरी दिंडी काढून आनंद साजरा केला. पेण एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेच्या वतीने दिंडी सोहळा आयोजित केला होता. पेण एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष ॲड. बापुसाहेब नेने, मुख्यध्यापिका लेखा ठाकूर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या वेळी शाळेतील शिक्षक, कर्मचारी पालक संघाचे सदस्य, माता पालक संघाचे सदस्य व पालक वर्ग उपस्थित होते.

टाळ वाजवत राम कृष्ण हरीच्या गजरात संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत बहिणाबाई, संत मुक्ताबाई, विठ्ठल-रखुमाई यांची वेशभूषा करून मुले रमलेली दिसली. मुली साडी परिधान करून डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन दिंडी सोहळ्यात सहभागी झाल्या. शाळेपासून निघालेली दिंडी महात्मा गांधी मंदिर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरून परत शाळेत आली. यावेळी अनेक भाविक भक्तांनी दिंडीचे स्वागत केले.

Web Title: Todays Latest Marathi News Vdk22b00833 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..