
शिहु बेणसे भागात विजेच्या लपंडाव
वडखळ, ता. ११ (बातमीदार) : पेण तालुक्यातील शिहु बेणसे विभागात विजेचा लपंडाव सुरू आहे. दोन-तीन दिवस संपूर्ण विभागात वीज गायब असते. त्यामुळे अबालवृद्धांची मोठी गैरसोय होत असून नागरिक हैराण झाले आहेत. येथील विजेची समस्येसंदर्भात महावितरणला निवेदन दिले असून ही समस्या तत्काळ सोडवावी; अन्यथा महावितरण कंपनीविरुध्द जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा युवा नेते प्रसाद भोईर यांनी दिला आहे.
शिहु बेणसे भागातील नागरिक विजेच्या समस्याने हैराण झाली आहेत. वारंवार वीज खंडित होत असते. दोन-तीन दिवस वीज पूर्ववत होत नाही. त्याचा ज्येष्ठांसह लहान मुलांनाही त्रास होत आहे. येथील विजेचा हा प्रश्न तातडीने महावितरणने सोडवावा; अन्यथा महावितरणविरोधात जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा भोईर यांनी दिला. या वेळी युवा नेते प्रसाद भोईर, माजी पंचायत समिती सभापती संजय भोईर, अमृत कुथे, घनश्याम कुथे, जयराम म्हात्रे आदींच्या शिष्टमंडळाने महावितरणचे अधीक्षक अभियंता मुळानी यांना या प्रश्नाबाबतचे गांभीर्य समजावून सांगितले. मुळानी यांनी या प्रकरणासंदर्भात उपअभियंता उमाकांत सपकाळे यांना तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Vdk22b00835 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..