उमेदवार निवडून आणण्यासाठी मोर्चेबांधणी करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उमेदवार निवडून आणण्यासाठी मोर्चेबांधणी करा
उमेदवार निवडून आणण्यासाठी मोर्चेबांधणी करा

उमेदवार निवडून आणण्यासाठी मोर्चेबांधणी करा

sakal_logo
By

वडखळ, ता. ११ (बातमीदार) : शिवसेनेच्या संपर्क कार्यालयातून सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवून पक्षसंघटना अधिक वाढवण्यासाठी जोमाने कामाला लागा. आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी मोर्चेबांधणी करा, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी पेण येथे शिवसेना संपर्क कार्यालयाच्या उद्‍घाटनप्रसंगी केले.
पेण शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्‍घाटन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. आपापसातील मतभेद विसरून एकदिलाने कामाला लागा. शिवसेनेचे दरवाजे सर्वांसाठी खुले करा. इतर पक्षांतून येणाऱ्यांचे खुल्या दिलाने स्वागत करा, असे प्रतिपादन किशोर जैन यांनी यावेळी केले. गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे शिवसैनिक या धर्तीवर जास्तीत जास्त नवीन सभासद नोंदणी करा, असे माजी जिल्हाप्रमुख विष्णू पाटील यांनी यावेळी सांगितले. या वेळी सहसंपर्कप्रमुख किशोर जैन, माजी जिल्हाप्रमुख विष्णू पाटील उपजिल्हाप्रमुख अविनाश म्हात्रे, पेण तालुकाप्रमुख जगदीश ठाकूर, माजी उपजिल्हाप्रमुख नरेश गावंड, महिला आघाडीच्या दीपश्री पोटफोडे, शहरप्रमुख संजय पाटील, तालुका संपर्कप्रमुख राजाराम पाटील, वाहतूक सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रीतेज कदम, वाहतूक सेनेचे अलिबाग जिल्हाध्यक्ष अच्युत पाटील, जिते विभागप्रमुख राजू पाटील, नरेश सोनवणे यांच्यासह शिवसेना, वाहतूक सेना, महिला आघाडीचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Vdk22b00860 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..