पिठोरी अमावस्या उत्साहात साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिठोरी अमावस्या उत्साहात साजरी
पिठोरी अमावस्या उत्साहात साजरी

पिठोरी अमावस्या उत्साहात साजरी

sakal_logo
By

वडखळ, ता. २७ (बातमीदार) : श्रावण महिना म्हणजे विविध सणांचा महिना नागपंचमी, रक्षाबंधन, नारळी पोर्णिमा, गोपाळकाला असे विविध सण व धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात. त्याचप्रमाणे श्रावण महिन्यातील पिठोरी अमावस्या परंपरेनुसार उत्साहात साजरी करण्यात आली.
पिठोरी अमावस्या गाव अथवा आळीतील एकाच ठिकाणी साजरा केला गेला. काही स्त्रियांनी गावातील नदीकाठच्या, ओढ्याकाठच्या तेरड्याच्या फुलाची झाडे पूजा करून घरात आणली. नंतर या झाडांना फुलांनी आणि साडीने सजवल्यानंतर पिठोरी मातेची प्रतिष्ठापना केली. सांयकाळी पूजा व आरती केल्यानंतर महिलांनी पारंपरिक नृत्य सादर करून उत्साहात सहभागी झाल्या. पहाटे पिठोरी मातेचे विसर्जन नदी, ओढ्यात करण्यात आले.

रेवदंडा येथे महिलांचे जागरण
रेवदंडा ता. २७ (बातमीदार) : ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने शनिवारी (ता. २६) पिठोरी अमावस्या उत्साहात साजरी झाली. महिलांनी सजवलेल्या पिठोरीची (मुखवट्या) पूजा केली. नैवेद्याला मोदक किंवा खीर-पुरी करण्यात आली होती. महिलांनी विविध कार्यक्रम करून जागरण केले. काही ठिकाणी भजनांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Vdk22b00872 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..