खरेदीला उधाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खरेदीला उधाण
खरेदीला उधाण

खरेदीला उधाण

sakal_logo
By

प्रदीप मोकल, वडखळ
गणरायाचे आगमन अवघ्‍या दोन दिवसांवर आले असून बाप्पाची सजावट, रंगरंगोटी, विद्युत उपकरणे, पूजा साहित्य, वाद्य, पाट-चौरंग आदींच्या खरेदीसाठी उधाण आले आहे. जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठा, आठवडाबाजारांमध्ये आरास सजावटीसाठी यंदा कागदी, फुलांचे, कापडी, लाकडाच्या मखरांना पसंती दर्शवली जात आहे. सजावट साहित्‍याच्या किमती १५ ते २० टक्क्‍यांनी वाढल्‍या आहेत, मात्र दोन वर्षांनंतर उत्‍साहात गणेशोत्‍सव साजरा होणार असल्‍याने भक्‍तांपुढे उत्‍साह-श्रद्धेचे मोल अधिक आहे. पर्यावरणपूरक, इको-फ्रेंडली मखरांमध्ये मंदिर, राजवाडा, कलश, पालखी याबरोबरच पाळणा, मयूरपंख असे विविध प्रकार भक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत. फुलांची सजावट, कागदी पुठ्ठ्यांचे मखरांचे दर सुमारे ७०० रुपयांपासून सात हजार रुपयांपर्यंत आहेत. त्याचबरोबर लाकडी मखरांच्या किमती दोन हजार रुपयांपर्यंत आहेत. फुलाच्या माळा, रंगीत, रेशमी, सिल्‍कचे कापड, विविधरंगी झालर, मण्यांच्या तोरणांनाही मोठी मागणी आहे.

गणेशोत्सव म्हटला की, आरती, भजन, कीर्तन, पारंपरिक नाच, लोककला असे विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. त्‍यासाठी ढोलकी, ढोल, मृदुंग, टाळ, चिपळ्या अशा वाद्यांना मागणी वाढते. पेणमधील रेल्वेस्थानकासमोर उत्तर प्रदेशहून जवळजवळ १५ ते १६ ढोलकी विक्रेत्‍यांनी व्यवसाय थाटला असून अवघ्‍या १०० रुपयांपासून २,५०० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. तालुक्‍यातील वाशी, वडखळ, गडब आदी गावांत महिनाभरापूर्वी हे ढोलकी विक्रेते दाखल झाले आहेत. ढोलकी बनविण्यासाठी लागणारी रस्सी, चामडे, रिंग आदी साहित्य उत्तर प्रदेशहून आणले जाते. दरवर्षी गणेशोत्‍सवादरम्‍यान येणाऱ्या विक्रेत्‍यांना चांगला नफा होतो.
- महमंद नसीव, ढोलकी विक्रेता

मखरांचे दर
लाकडी - २,००० - ६,०००
पुठ्ठा, कृत्रिम फुले - १,००० ते ७,०००
कापडी सजावट - ४,००० ते १२,०००

..............

वासांबे-मोहोपाडा बाजारपेठ सजली
रसायनी ः वासांबे-मोहोपाडा बाजारपेठेत कापडी, प्लास्‍टिक, फुलांना विशेष मागणी आहे. तोरण, माळ, वेल, हार, फुलांची कुंडी, मोत्याचे कंठी आदी वस्‍तूंच्या खरेदीतून यंदा मोठी उलाढाल होत आहे. दोन वर्षे ठप्प असलेला व्यवसाय यंदा तेजीत असल्‍याने विक्रेत्‍यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत सकाळ-सायंकाळी मोठी गर्दी होत आहे.

............................

Web Title: Todays Latest Marathi News Vdk22b00873 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..