प्रकल्‍प बाधितांच्या न्यायासाठी प्रयत्‍न करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रकल्‍प बाधितांच्या न्यायासाठी प्रयत्‍न करणार
प्रकल्‍प बाधितांच्या न्यायासाठी प्रयत्‍न करणार

प्रकल्‍प बाधितांच्या न्यायासाठी प्रयत्‍न करणार

sakal_logo
By

वडखळ, ता. १ (बातमीदार)ः एमआयडीसीमार्फत तालुक्यातील डोलवी औद्योगिक विकास क्षेत्रासाठी काराव, गडब, डोलवी, वडखळ, बोरी ग्रामपंचायतील जमीन संपादित करण्यात येणार आहे. या भूसंपादनाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. भूसंपादन रद्द करावे यासाठी स्थानिक आमदार रवी पाटील यांची भेट घेत निवेदन दिले. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत संबंधित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेऊन भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध असल्यास चर्चा करून शेतकऱ्यांची भूमिका शासनाकडे मांडण्यात येईल आणि न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आमदार रवी पाटील यांनी शेतकऱ्यांना सांगितले.
यावेळी के. जी. म्हात्रे, काराव-गडब ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच लक्ष्मण कोठेकर, सीताराम चवरकर, के. पी. पाटील, गजानन पेढवी, संजय चवरकर, सुशील कोठेकर, दिनेश म्हात्रे, महेश पाटील, प्रभाकर पाटील, प्रवीण म्हात्रे आदी शेतकरी उपस्थित होते.

वडखळ ः प्रकल्पबाधित शेतकऱ्यांसोबत आमदार रवी पाटील यांनी चर्चा केली.

Web Title: Todays Latest Marathi News Vdk22b00877 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..