एसटी चालकाला दोन तरुणांकडून बेदम मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी चालकाला दोन तरुणांकडून बेदम मारहाण
एसटी चालकाला दोन तरुणांकडून बेदम मारहाण

एसटी चालकाला दोन तरुणांकडून बेदम मारहाण

sakal_logo
By

वडखळ, ता. १८ (बातमीदार)ः ओव्हरटेक केल्याच्या रागातून दोन तरुणांनी रामवाडी सर्व्हिस रोडवर एसटी चालकाला जबर मारहाण केल्याची घटना पेणमध्ये घडली. अलिबाग येथील एसटी चालक स्वप्नील भगत (रा. वडगाव) हे पनवेल-अलिबाग एसटी घेऊन जात असताना पेण रामवाडी सर्विस रोडवर आले असता ओव्हरटेक केल्याच्या शुल्लक कारणावरून रामवाडी येथे राहणारे दोन तरुणांनी त्यांना एसटीतून बाहेर खेचून शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून रक्तबंबाळ केले.
स्थानिकांनी मारहाण सोडवून पोलिसांना बोलाविले. पोलिसांनी तरुणांना ताब्यात घेतले असून एसटी चालकाला प्रथम उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. याबाबत पेण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Vdk22b00888 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..