खड्डे भरण्यास समाज संस्थेचा पुढाकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खड्डे भरण्यास समाज संस्थेचा पुढाकार
खड्डे भरण्यास समाज संस्थेचा पुढाकार

खड्डे भरण्यास समाज संस्थेचा पुढाकार

sakal_logo
By

वडखळ, ता. १९ (बातमीदार) ः मुंबई-गोवा महामार्गाला खड्ड्याने ग्रासले असून यंत्रणेच्या उपाययोजनाही कमी पडत आहेत. त्‍यामुळे आपल्‍या गावातून जाणार्‌या महामार्गावरील खड्डे भरण्यास समाज संस्थेने पुढाकार घेऊन गडब परिसरातील बहुतांश खड्डे बुजवले. त्‍यामुळे वाहनचालकांनी समाधान व्यक्‍त केले. संस्थेचे अध्यक्ष संदीप म्हात्रे, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, कैलास पाटील तेजस पाटील, जयेश केणी, ऋषिकेश कोठेकर आदींनी परिश्रम घेतले. वाहनचालकांच्या समस्‍या ओळखून समाज संस्थेने सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्‍न केला असून गावा-गावातील तरुणांनी पुढाकार घेत शक्य तेवढे खड्डे बुजवावेत, असे आवाहन समाज संस्थेचे अध्यक्ष संदीप म्हात्रे यांनी केले आहे.
वडखळ ः मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे समाज संस्थेचे कार्यकर्त्यांनी बुजवले. (छायाचित्र ः प्रदीप मोकल)

Web Title: Todays Latest Marathi News Vdk22b00889 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..