गडबमध्ये १०० नागरिकांचे रक्‍तदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडबमध्ये १०० नागरिकांचे रक्‍तदान
गडबमध्ये १०० नागरिकांचे रक्‍तदान

गडबमध्ये १०० नागरिकांचे रक्‍तदान

sakal_logo
By

वडखळ ता. १३ (बातमीदार) ः एकच ध्यास गडबचा विकास या संघटनेने रक्तदान शिबिराचे आयोजन संस्कार विद्यालयात केले होते. या वेळी राज्य रक्त संक्रमण परिषद अलिबाग रुग्णालय रक्तपेढीच्या माध्यमातून १०० नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. कार्यक्रमासाठी संघटनेचे दिनेश म्हात्रे, संजय चवरकर, देविदास कोठेकर, अभिजित पाटील, संदीप म्हात्रे, कमलाकर पाटील, ऋषीकेश कोठेकर, यशवंत पाटील यांनी परिश्रम घेतले. जगातील कोणत्याही कंपनीमध्ये रक्त करता येत नाही. रक्ताला जात, पात, धर्म नसून फक्त माणुसकी असते, अशी भावना रक्तदात्यांच्या मनात रुजली पाहिजे, असे प्रतिपादन संघटनेचे प्रमुख दिनेश म्हात्रे यांनी व्यक्त केले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील, माजी मुख्याध्यापक के.पी. पाटील, संस्कार शाळेचे अध्यक्ष संजय चवरकर, डॉ. दीपक गोसावी, दिलीप पाटील, प्रकाश पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांचा प्रमाणपत्र, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.