दिवाणमाळ येथे वनराई बंधारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाणमाळ येथे वनराई बंधारा
दिवाणमाळ येथे वनराई बंधारा

दिवाणमाळ येथे वनराई बंधारा

sakal_logo
By

वडखळ, ता. २२ (बातमीदार) : कृषी विभागातर्फे ''एक दिवस बळीराजासाठी'' या योजनेतून पेण तालुका कृषी विभागातर्फे दिवाणमाळ येथील शेतकरी संतोष मांढरे यांच्या शेतालगत पाणी अडवून वनराई पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला.
पेण कृषी विभागातर्फे शेकडो शेतकर्‍यांना रब्बी हंगामात मूग, चवळी, चणे असे कडधान्य लागवडीसाठी देण्यात आले आहे. संतोष मांढरे यांच्या शेतावर आलेल्या रोपांना आणि इतर भाजीपाल्यांसाठी थोड्या पाण्याची आवश्यकता होती. यासाठी वाहून जात असलेले पाणी अडवून भाजीपाल्यासाठी वापरता येईल, या हेतूने जिल्हा कृषी अधिकारी कैलास वानखेडे व तालुका कृषी अधिकारी सुरोशे यांच्या मार्गदर्शनाने कृषी पर्यवेक्षक पोटे व सहकारी शिंदे, मंजुषा पाटील, कृषी सहायक व्ही. एस. लडगे व शेतकरी संतोष मांढरे यांनी एकत्रित येत त्यांच्याच शेतावर वनराई बंधारा नुकताच बांधला. आता या वनराई बंधार्‍यामुळे पाणी अडले जात आहे. त्याचा भाजीपाला व कडधान्य पिकासाठी फार मोठा उपयोग या झाला आहे.