सेझ प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाची लाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेझ प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाची लाट
सेझ प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाची लाट

सेझ प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाची लाट

sakal_logo
By

वडखळ, ता. १३ (बातमीदार)ः महामुंबई सेझ प्रकल्पासाठी पंधरा वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केलेल्या आहेत; मात्र या जमिनींवर कोणताही प्रकल्प उभा राहिला नसल्याने प्रकल्पग्रस्तांकडून जमिनी परत करण्याची मागणी होत आहे. पेण तालुक्यातील वाशी गावात झालेल्या सभेत सेझबाधित शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झालाच पाहिजे, अशी मागणी करण्यात आली; तर यासाठी वेळप्रसंगी विधिमंडळ बंद पाडण्याचा इशारा आमदार जयंत पाटील यांनी दिला आहे.
खारेपाटामधील शेतकऱ्यांशी आमदार जयंत पाटील यांनी संवाद साधला होता. या वेळी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सेझसंदर्भात मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानंतर भविष्यात सात-बारा कसा कोरा करता येईल, यासंदर्भात विचार-विनिमय करण्यात आला. सेझबाधित शेतकऱ्यांच्या जमिनी पूर्ववत परत मिळवण्यासाठी आग्रही आहेत. नियमानुसार एखाद्या प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जागेवर १५ वर्षांच्या आत प्रकल्प उभा राहिला नाही, तर संपादित केलेली जागा शेतकऱ्यांना परत करायची असते. त्याच नियमानुसार पेण, उरण, पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांचे सातबारे कोरे करण्यासाठी आमदार जयंत पाटील यांनी अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडून सरकारला जाब विचारल होता. या वेळी सेझचा लढा पक्ष बाजूला ठेवून लढण्याचा निर्धार त्यांनी केला. तसेच एकत्रित राहा, आपल्याला लढा मोठा करायचा आहे. यासाठी वेळप्रसंगी विधिमंडळ बंद करण्याचा इशारादेखील त्यांनी याप्रसंगी दिला.
-------------------------------------------------------------
नैना प्रकल्प, एमआयडीसी, विरार-अलिबाग कॉरिडॉर, गेल पाईपलाईन प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या आहेत, पण सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत नसेल तर तीव्र संघर्ष करण्याची तयारी आहे.
- जयंत पाटील, आमदार, शेकाप