पदपथांवर बांधणार शौचालय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

मुंबई - महापालिकेने पदपथांवर सार्वजनिक शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला आहे. पदपथाचा १.८ मीटरचा भाग सोडून शौचालय बांधण्यात येणार आहे. राईट टू पी मोहिमेला पालिकेच्या निर्णयामुळे पाठबळ मिळण्याची शक्‍यता आहे.

मुंबई - महापालिकेने पदपथांवर सार्वजनिक शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला आहे. पदपथाचा १.८ मीटरचा भाग सोडून शौचालय बांधण्यात येणार आहे. राईट टू पी मोहिमेला पालिकेच्या निर्णयामुळे पाठबळ मिळण्याची शक्‍यता आहे.

नोकरी वा इतर कारणाने घराबाहेर पडणाऱ्या महिलांसाठी वर्दळीच्या ठिकाणी स्वच्छतागृह उभारण्याची मागणी राईट टू पी मोहिमेद्वारे गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. त्या मागणीनुसार पालिकेने २०१६ मध्ये स्वच्छतागृह बांधण्यासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद केली होती; मात्र वर्दळीच्या ठिकाणी स्वच्छतागृह बांधण्यासाठी जागाच मिळत नसल्याने पालिकेचा निधी वाया गेला. त्यावर उपाय म्हणून आता पदपथांवर शौचालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आला, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. पूर्व आणि पश्‍चिम द्रुतगती मार्गावर अनेक वर्षांपासून सार्वजनिक शौचालय बांधण्याचा प्रयत्न केला जात आहे; मात्र त्यात यश आले नाही.

सार्वजनिक शौचालय बांधताना लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांचा विचार करण्यात यावा, अशी सूचना आयुक्त अजोय मेहता यांनी केली आहे. त्यानुसार शौचालयात जाण्यासाठी रॅम्प बनविण्यात येणार आहे. कमोडही ठेवण्यात येणार आहे.

अर्थसंकल्पात - 10 कोटी
तीन वर्षांत - 20 हजार शौचकूप बांधणार

पालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत पैसे द्या आणि वापरा तत्त्वावर ७५० शौचकूप बांधली
रेल्वे आणि बस स्थानके व बाजार अशा वर्दळीच्या ठिकाणी प्राधान्याने बांधण्यात येणार
रस्ता किंवा पदपथाच्या शेवटी म्हणजे डेड एण्डला स्वच्छतागृह बांधणार
पे अॅण्ड युजअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या शौचालयात ४० टक्के महिलांना राखीव

Web Title: toilet on footpath