दलित वस्तीतील शौचालयाला तारेचे कुंपण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 जानेवारी 2019

भिवंडी तालुक्यातील खालिंग बु. या गावी शासनाच्या दलित वस्ती सुधारणा योजने अंतर्गत बांधल्या गेलेल्या शौचालयास येथील ग्रामसेविकेने आणि येथील पुढारी पंचायत समिती सदस्य गुरुनाथ जाधव यांच्या संगनमताने येथील रस्ता बंद केला आहे. त्यामुळे येथील दलित ग्रामस्थ, लहान मुले, महिला यांची मोठया प्रमाणात प्रातर्विधीसाठी कुचंबणा होत आहे.

वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील मौजे खालिंद बु. येथे दलित सुधारणा योजने अंतर्गत बांधकाम केलेल्या शौचालयास तारेचे कुंपण घालून ते शौचालय ग्रामसेविका रजना शेलार व माजी सरपंच रोहिदास शेलार यांनी मनमानी पणे बंद केल्याने स्वछता अभियानाचे तीन तेरा वाजले आहेत. त्यामुळे परीसरात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

भिवंडी तालुक्यातील खालिंग बु. या गावी शासनाच्या दलित वस्ती सुधारणा योजने अंतर्गत बांधल्या गेलेल्या शौचालयास येथील ग्रामसेविकेने आणि येथील पुढारी पंचायत समिती सदस्य गुरुनाथ जाधव यांच्या संगनमताने येथील रस्ता बंद केला आहे. त्यामुळे येथील दलित ग्रामस्थ, लहान मुले, महिला यांची मोठया प्रमाणात प्रातर्विधीसाठी कुचंबणा होत आहे. त्यामूळे येथील दलित वस्तीतील ग्रामस्थ वृद्ध नागरिक हे नाईलाजास्तव बाहेर उघड्यावर बसत असल्याने येथील स्वच्छता अभियानाचे तीन तेरा वाजले असून ग्राम पंचायत स्तरावर ग्राम स्वछता अभियानाची अंमल बजावणी करणारे शासनाचे स्वछता दूतच स्वच्छता अभियानात आडकाठी निर्माण करीत असल्याने येथील ग्रामस्थां मध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तर काही नागरीकांना रात्रीच्या वेळेस शैचालयास जाते वेळी खाली पडून दुखापत ही झाल्याच्या घटना घडली आहे.

या बाबत ग्रामसेविका रंजना शेलार यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे. दरम्यान याबाबत दीपक भाऊ निकाळजे, सामाजिक विकास संघटना भिवंडी तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव यांनी सदर प्रकार उघडकीस आणून दोषींवर कारवाई करण्याची मागणी उप विभागिय अधिकारी भिवंडी (प्रांत) यांच्या कडे  केली आहे.

Web Title: toilet issue in Bhiwandi