मुंबई- पुणे एक्‍स्प्रेस वेवर टोलवसुलीत गैरप्रकार?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

मुंबई - मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वेवर टोलवसुली करण्यामध्ये गैरप्रकार होत असल्याचा आरोप करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे.

मुंबई - मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वेवर टोलवसुली करण्यामध्ये गैरप्रकार होत असल्याचा आरोप करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे.

माहिती अधिकाराचे कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांच्यासह चारजणांनी दाखल केलेल्या याचिकेत मुंबई पुणे एक्‍स्प्रेस वेवरील टोलवसुली बंद करण्याची मागणी केली आहे. टोल कंत्राटदारांनी आतापर्यंत तब्बल 2 हजार 869 कोटींचे उत्पन्न मिळविले असून मार्च महिन्यात गैरप्रकारे सुमारे 325 कोटी रुपये चालकांकडून वसूल केले, असा आरोप याचिकेत केला आहे. त्याशिवाय अन्य 53 टोल प्लाझाही बंद करण्याची मागणी केली आहे. मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर यांच्या खंडपीठापुढे आज याचिकेचा उल्लेख करण्यात आला. न्यायालयाने सर्व पक्षकारांना नोटीस बजावण्याचे निर्देश याचिकादारांना दिले आहेत. राज्य सरकारसह म्हैसकर इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रा. लिमिटेडलाही याचिकेत प्रतिवादी केले आहे. याचिकेवर पुढील सुनावणी मंगळवारी (ता.25) होणार आहे.

Web Title: toll recovery irregularities on mumbai-pune express way