तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक

File Photo
File Photo


मुंबई : उपनगरी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर तांत्रिक कामांसाठी रविवारी (ता. १७) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कुर्ला स्थानकातील जुना पादचारी पूल पाडण्यासाठी शनिवारी (ता. १६) रात्री ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.


आज रात्री कुर्ला स्थानकात ब्लॉक
कुर्ला स्थानकातील पादचारी पुलाच्या कामासाठी शनिवारी रात्री ११.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येईल. मध्यरात्री १२.४६ वाजल्यानंतर माटुंग्यापासून विद्याविहारपर्यंत ‘डाऊन’ धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरून चालवण्यात येतील.

मध्य रेल्वे 
कुठे :
कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान जलद मार्गावर.
कधी : सकाळी ११.२० ते दुपारी ३.५० वाजेपर्यंत.
परिणाम : कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान ‘अप’ जलद लोकल धीम्या मार्गावर. लोकल, मेल-एक्‍स्प्रेस २० ते २५ मिनिटे उशिराने. त्यामुळे रविवारी दुपारी ३.४० वाजता दादरहून विशेष लोकल.

हार्बर मार्ग 
कुठे :
पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान ‘अप’ आणि ‘डाऊन’ मार्गांवर.
कधी : सकाळी ११.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत.
परिणाम : बेलापूर/पनवेल-सीएसएमटी-बेलापूर/पनवेल या मार्गांवरील लोकल सेवा बंद. ट्रान्स हार्बरवर ठाणे-पनवेल-ठाणे आणि पनवेल-अंधेरी व खारकोपर-नेरूळ या मार्गांवरील लोकल रद्द. प्रवाशांच्या सोईसाठी सीएसएमटी-वाशी आणि ठाणे-वाशी/नेरूळ या मार्गांवर विशेष लोकल.

पश्‍चिम रेल्वे 
कुठे :
मरिन लाईन्स ते माहीमदरम्यान ‘डाऊन’ धीम्या मार्गावर.
कधी : सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत.
परिणाम : ‘डाऊन’ धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर. या लोकल महालक्ष्मी, प्रभादेवी, माटुंगा स्थानकांत थांबणार नाहीत; लोअर परळ आणि माहीम स्थानकांत लोकलना दोन वेळा थांबा.


पश्‍चिम रेल्वेवर ४० दिवसांचा ब्लॉक
मुंबई :
पश्‍चिम रेल्वेवरील लोअर परळ येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी ४० दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. १३ नोव्हेंबर ते २४ डिसेंबर या काळात मध्यरात्री १.२५ ते पहाटे ५.२५ वाजेपर्यंत विरार दिशेकडील धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल; त्यामुळे अनेक लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

मार्गात बदल
पहाटे ४.१५ ची चर्चगेट-विरार लोकल, तसेच पहाटे ४.१९, ४.३८, ४.४६, ५ या चर्चगेट-बोरिवली लोकल मुंबई सेंट्रल ते माहीम स्थानकांदरम्यान जलद मार्गावर चालवण्यात येतील. 

रद्द लोकल
पहाटे ५.०६ वाजता : महालक्ष्मी ते भाईंदर.
पहाटे ५.२० : महालक्ष्मी ते बोरिवली.
सकाळी ६.०७ : बोरिवली ते चर्चगेट.
सकाळी ६.२७ : बोरिवली ते चर्चगेट.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com