पाण्याखाली काम करणाऱ्या उपकरणाचे मॉडेल अव्वल

पाण्याखाली काम करणाऱ्या उपकरणाचे मॉडेल अव्वल

मुंबई - पाच वर्षे मेहनत घेऊन मुंबई आयआयटीमधील विद्यार्थ्यांनी पाण्याखाली काम करणाऱ्या ऑटोनॉमस अंडरवॉटर व्हेईकलचे (एयूव्ही) मॉडेल तयार केले होते. देशपातळीवर या मॉडेलने चमकदार कामगिरी केली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशियन टेक्‍नॉलॉजीमार्फत (एनआयओटी) चेन्नई येथे स्टुडंट अंडरवॉटर ऑटोनॉमस व्हेईकल (एसव्ही) स्पर्धा घेण्यात आली. त्यात मुंबई आयआयटीने अव्वल क्रमांक पटकावला आहे.

जगभरातल्या संघांशी स्पर्धा करत हे यश मिळाले आहे. स्पर्धेच्या ठिकाणाला "वरदा' वादळाचा फटका बसलेला असतानाही प्रतिकूल परिस्थितीत या टीमने अव्वल क्रमांक पटकावला.

यंदा एकूण 14 संघांनी या स्पर्धेत भाग घेतला. आंतरराष्ट्रीय पातळीवरील "रोबोसब' ही स्पर्धा घेणारा कॅलिफोर्नियातील संघही या स्पर्धेत होता. चेन्नईतील आयआयटीचा जलतरण तलाव हे या स्पर्धेचे मूळ ठिकाण होते. वादळाच्या फटक्‍यामुळे दोन दिवस विजेचा लपंडाव सुरू होता. त्यामुळे लॅपटॉप चार्जिंगसाठी वीज नव्हती. व्हेईकलचे सेन्सरही वादळामुळे खराब झाले. आयत्यावेळी बदललेल्या खासगी जलतरण तलावाच्या ठिकाणी अवघ्या अर्ध्या दिवसाच्या तयारीत ही स्पर्धा जिंकण्याची कामगिरी मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी केली. "एयूव्ही' तयार करण्यासाठी 25 लाखांचा खर्च आला होता. एयूव्हीमध्ये मायक्रोफोन आणि ग्रिपरही बसवण्यात आले होते. सहा महिने व्हेईकल तयार करण्यासाठी आणि तीन महिने एयूव्हीच्या तपासणीसाठी लागले. टप्प्याटप्प्याने एयूव्ही विकसित करण्यास पाच वर्षे लागली, असे वरुण मित्तल या "मत्स्य' टीमच्या सदस्याने सांगितले.

एयूव्हीचे उपयोग
- तेलवाहिनीचे तडे शोधणे
- पाण्याखालचे संशोधन प्रकल्प
- दुर्गम ठिकाणची कामे
- ब्लॅक बॉक्‍स शोधणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com