कासवचोराला चार दिवसांची कोठडी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

मुंबई - वांद्रे परिसरातून हॉक बिल या संरक्षित प्रजातीचे कासव पकडल्याप्रकरणी वन विभागाने ताब्यात घेतलेल्या राजू रामा याला वांद्रे न्यायालयाने चार दिवसांची कोठडी सुनावली आहे.

मुंबई - वांद्रे परिसरातून हॉक बिल या संरक्षित प्रजातीचे कासव पकडल्याप्रकरणी वन विभागाने ताब्यात घेतलेल्या राजू रामा याला वांद्रे न्यायालयाने चार दिवसांची कोठडी सुनावली आहे.

राज्यात पहिल्यांदाच कासव चोरीप्रकरणी आरोपीला चार दिवसांची कोठडी मिळाली आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला सात वर्षे तुरुंगवासाची शिक्षा मिळू शकते. २६ जुलैला वांद्रे बॅण्ड स्टॅण्ड परिसरात दोघे जण जाळ्यातून कासव नेत असल्याचे नागरिकांनी पाहिले होते. हॉक बिलचे वन्यजीवनातील महत्त्व पाहता आरोपीची सुटका होता कामा नये, अशी बाजू कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मांडली, अशी माहिती उपवनसंरक्षक मकरंद घोडके यांनी दिली. दुसऱ्या आरोपीचाही शोध सुरू आहे.

Web Title: Tortoise theft criminal four-day custody

टॅग्स