मुंबईत कोरोनाचा भडका ! गेल्या २४ तासात वाढले तब्बल ९९८ रुग्ण, मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा..  

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 May 2020

आज मुंबईतील विविध परिसरात ९९८ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने रुग्णांची संख्या १६,५७९ झाली आहे. 

मुंबई : मुंबईत आज नव्या ९९८ रुग्णांची भर पडल्याने रुग्णांचा आकडा १६ हजाराच्या पुढे गेला आहे. त्यामुळे मुंबईत वेगाने वाढणारी रुग्णसंख्या १६,५७९ वर पोचली आहे. आज २५ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ६२१ वर पोचला आहे. 
 

आज आढळलेल्या ९९८ रुग्णांपैकी ६३४ रुग्ण आज सापडले असून ३६४ रुग्ण तीन दिवसांपूर्वीचे आहेत. आज झालेल्या २५ मृत्यूंपैकी १६ जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये १८ पुरुष तर ७ महिलांचा समावेश होता. मृत झालेल्या रुग्णांपैकी एकाचे वय ४० च्या खाली होते. १४ रुग्णांचे वय ६० वर्षा वर होते. तर उर्वरित १० रुग्ण  ते ६० वर्षा दरम्यान होते. मुंबईतील मृतांचा एकूण आकडा ६२१ झाला आहे. 

हेही वाचा: चक्रावून टाकणारी घटना! बायकोनं बेडरुममध्ये बोलावलं,नवऱ्यानं नाही म्हंटलं म्हणून तिनं काय केलं वाचा.. 

संशयित रुग्णांमध्ये ही वाढ झाली असून आज एकूण ६४३ नवे संशयित रुग्ण सापडले असून  आतापर्यंत १७,३७७ संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज ४४३ रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत ४२३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले. 

कोरोना काळजी केंद्रातील सुविधेत वाढ:
 
मुंबई मध्ये कोरोना रुग्णांची व मृतांची संख्या लक्षात घेऊन, कोविड १९ बाधितांची काळजी घेण्यासाठी मुंबई पालिका सातत्याने  सेवा-सुविधा अद्ययावत आहे. कोरोना काळजी केंद्र १ व्यवस्था क्षमता वाढवून आता ती २२ हजार ९४१ खाटा इतकी करण्र्यात आली आहे. या व्यवस्थेत संशयित रुग्ण व संपर्कातील व्यक्तींना ठेवले जाते. त्याचप्रमाणे एकूण २४१ कोरोना काळजी केंद्र २ (सीसीसी २) व्यवस्थेची क्षमता आता वाढून ३४ हजार ३२९ खाटा इतकी झाली आहे.

हेही वाचा: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या निकालांसंदर्भात सर्वात मोठा निर्णय... 

काही कोरोना काळजी केंद्र २ व्यवस्थेमध्ये ऑक्सिजन आणि अतिदक्षता सुविधा उपलब्ध करण्र्यात आली आहे. उदाहरणार्थ टी विभागातील मिठानगर शाळेमध्र्ये १० आयसीयु बेड उपलब्ध आहते. तसेच वरळी येथील नशॅनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथे ७० आयसीयु बेड उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. त्यात ४० मॉड्युलर तर ३० मोबाईल आयसीयू असतील. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स  एमएमआरडीए येथे १ हजार खाटांची तर गोरेगाव येथील नेस्को  मैदानावर १२४० खाटांची क्षमता असणारी सीसीसी २ व्यवस्था उभारण्याचे काम वेगाने  सरु आहे. या दोनही ठीकाणी काही ऑक्सिजन आणि काही मोबाईल आयसीयू बेडस देखील उपलब्ध केले जाणार आहेत.
 
कोरोना काळजी केंद्र २  व्यवस्थेमध्ये सौम्य लक्षणे असलेले आणि लक्षणे नसलेले पॉझिटिव्ह रुग्ण दाखल केले जातात. आता काही सुविधांमध्ये अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिल्याने मोठ्या रुग्णालयांवरील ताण हलका होऊन तीव्र बाधा असलेल्या रुग्णांवर उपचार करणे शक्य होणार आहे.

total 998 corona patients reportedin past 24 hours in mumbai read full story 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: total 998 corona patients reportedin past 24 hours in mumbai read full story