ठाणेकरांना मिळणार फिरत्या वाहनाद्वारे भाजी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

मुंबई - शेतकऱ्यांचा भाजीपाला व शेतमाल पोलिस कुटुंबीय व सर्वसामान्य ठाणेकरांना थेट विक्री करण्याचा उपक्रम ठाणे पोलिस आयुक्तालयाने दहा दिवसांपूर्वी सुरू केला होता. त्यासाठी ठाण्यात विविध ठिकाणी विक्री केंद्रे उभारण्यात आली आहेत. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून ठाणे पोलिसांनी आता आणखी एक पाऊल पुढे टाकले असून "फिरत्या वाहनाद्वारे भाजीपाला विक्री उपक्रम' सुरू करण्यात येणार आहे.

अभिनेते सयाजी शिंदे, पोलिस सहआयुक्त आशुतोष डुंबरे व पोलिस उपायुक्त डॉ. रश्‍मी करंदीकर यांच्या उपस्थितीत वाहनाचे उद्‌घाटन मंगळवारी (ता. 20) होणार आहे. ठाणे पोलिस आयुक्तालय, "माणगंगा ऑर्गेनिक फार्मर्स ग्रुप' व "चार गाव जलयुक्त शिवार अभियान' (पांढरवाडी, गोडसेवाडी, कोळेवाडी व दिवडी, ता. माण, जि. सातारा) यांच्या वतीने शेतकऱ्यांचा शेतमाल थेट पोलिस कुटुंबीय व सामान्य ठाणेकरांच्या घरापर्यंत पोचविणारा हा उपक्रम गेल्या दहा दिवसांपासून राबविण्यात येत आहे. आता त्यात फिरत्या विक्री केंद्राचीही भर पडेल.

Web Title: touring vehicle vegetable