माथेरानमध्‍ये पर्यटकांची गैरसोय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

माथेरानमध्‍ये प्रेक्षणीय स्थळांच्या ठिकाणी असणाऱ्या शौचालयांची दुरवस्था झाली आहे. त्‍यामुळे पर्यटकांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. पर्यटनाचा दर्जा टिकविण्यासाठी येथील दुरवस्था झालेली शौचालये सुस्थितीत करावीत; तसेच रस्त्यावरील दिवाबत्ती आणि रस्त्यांची सुधारणा करावी, अशी मागणी पर्यटकांकडून जोर धरत आहे. 

मुंबई : माथेरानमध्‍ये प्रेक्षणीय स्थळांच्या ठिकाणी असणाऱ्या शौचालयांची दुरवस्था झाली आहे. त्‍यामुळे पर्यटकांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. पर्यटनाचा दर्जा टिकविण्यासाठी येथील दुरवस्था झालेली शौचालये सुस्थितीत करावीत; तसेच रस्त्यावरील दिवाबत्ती आणि रस्त्यांची सुधारणा करावी, अशी मागणी पर्यटकांकडून जोर धरत आहे. 

माथेरानमध्ये 38 प्रेक्षणीय स्थळे आहेत. सर्व प्रेक्षणीय स्थळे वन खात्याच्या अखत्यारित येत असल्याने, येथे वनसंरक्षक समितीअंतर्गत पर्यटन व नागरिकांना सुविधा पुरविण्याचे; तसेच विकासकामे करण्याचे सर्वस्वी अधिकार आहेत. येथील एको पॉईंटवरील शौचालयांची दुरवस्था झाली आहे. वन विभागाने 30 लाख रुपये खर्चून 16 शौचालये बांधली आहेत. एको पॉईंट येथे 4 शौचालये असून ती दुरवस्थेत आहेत.

आम्ही एको पॉईंटला आलो असता आम्हाला शौचालयाला जायचे होते; मात्र येथील शौचालये अतिशय वाईट अवस्थेत होती. आमच्याकडून कर घेतला जातो; मग आम्हाला सोई-सुविधा का मिळत नाहीत? येथील प्रशासन कररूपात मिळणारा पैसा काय करते? असा प्रश्‍न पर्यटक ऍड. गीता पाटील यांनी उपस्‍थित केला आहे. 

माथेरानमधील एको पॉईंट येथे वन-व्यवस्थापनाची 4 शौचालये असून ती सध्या खराब अवस्थेत आहेत. त्या शौचालयांची तातडीने सुधारणा करून आम्ही चालविण्यास देणार आहोत. आमच्याकडून पर्यटकांना चांगल्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहील. 
- योगेश जाधव, अध्यक्ष वन-व्यवस्थापन समिती 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourist disadvantages in Matheran