esakal | शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याची परंपरा यंदा पहिल्यांदाच होणार खंडित
sakal

बोलून बातमी शोधा

शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याची परंपरा यंदा पहिल्यांदाच होणार खंडित

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे शिवतीर्थावर शिवसैनिकांच प्रथमच संबोधन करणार होते.

शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याची परंपरा यंदा पहिल्यांदाच होणार खंडित

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून चालत आलेली शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याची शिवसेनेची परंपरा यंदा पहिल्यांदाच खंडित होणार आहे. कोरोनाच्या सावटामुळे यंदाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर पार पडणार नाही. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवतीर्थावरील दसरा मेळावा रद्द करावा लागतोय. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्याने यंदाचा दसरा मेळावा शिवसेनेसाठी खास असाच आहे. मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हा पहिला दसरा मेळावा आहे. मात्र कोरोनाच्या सावटामुळे यंदाचा दसरा मेळावा शिवसेनेला शिवतीर्थावर साजरा करता येणार नाहीये. कोरोना संकटामुळे जाहीर सभांना बंदी आहे. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे शिवतीर्थावर शिवसैनिकांच संबोधन करणार होते. मात्र कोरोनामुळे जाहीर सभांना बंदी आहे त्यामुळे यंदा शिवसेनेकडून वेगळा प्लान आखला गेलाय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात यंदाचा दसरा मेळावा पोहोचवण्यासाठी एक वेगळी योजना तयार करण्यात आलीये.  या दसरा मेळाव्याच्या लिंक्स ऑनलाईन तयार करून सर्वांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. दरवर्षी शिवतीर्थावर शिवसेनेच्या नेत्यांची भाषणं होतात, काही कार्यक्रम पार पडतात आणि त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपलं संबोधन करतात. यंदाही त्याच प्रकारे आधी काही सांस्कृतिक कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने सर्वांसमोर सादर केले जातील. त्यानंतर जुने शिवसैनिक भाषणं करतील आणि शेवटी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तमाम शिवसैनिकांना संबोधित करतील. 

महत्त्वाची बातमी : फडणवीसांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, केवळ घोषणा नको, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष : 

बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यंदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम सांभाळत आहेत. मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर देशपातळीवर आणि राज्य पातळीवर स्वतः मुख्यमंत्र्यांबाबत अनेक गोष्टी बोलल्या गेल्यात. त्यामध्ये मुखत्वे हिंदुत्वाचा मुद्दा सामील होतो. या आणि अशा गोष्टींवर उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष असेल. सोबतच नुकतंच घडलेलं कंगना प्रकरण, सुशांतसिंह राजापूर मृत्यू प्रकरण या  आणि अशा अनेक गोष्टींवर उद्धव ठाकरे यंदाच्या दसरा मेळाव्यातून काय भाष्य करतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

tradition of shivsenas dussehra rally to break this time due to corona pandemic