कल्याणमधील शहाडा पुलाजवळ पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत

रविंद्र खरात 
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

- कल्याण डोंबिवली शहरी भागात पूरपरिस्थिती होती ,परिस्थिती पूर्व पदावर येत होती.

- तर कल्याण येथील मोहना रोड वर शहाड पुलाजवळ पावसाचे पाणी आज, सोमवार दुपार पर्यंत साचल्याने कल्याण मोहना रोडची वाहतुक विस्कळीत झाली होती .

कल्याण : कल्याण डोंबिवली शहरी भागात पूरपरिस्थिती होती. परिस्थिती पूर्व पदावर येत असताना आज, सोमवार दुपारपर्यंत कल्याण येथील मोहना रोडवर शहाड पुलाजवळ पावसाचे पाणी साचल्याने वाहतुक विस्कळीत झाली होती.

शनिवार (ता. 3) ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाने कल्याण डोंबिवली शहरी आणि ग्रामीण भागात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. यात अनेक रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प होती. ही परिस्थिती पूर्वपदावर येत असताना कल्याण मोहनारोडवरील शहाड पुलाखाली वाहतूक विस्कळीत झाली होती.

एकीकडे कल्याण अहमदनगर महामार्गावरील रायता पूल खचल्याने कल्याण मुरबाड रोड वरील वाहतूक बंद करून कल्याण मोहना मार्गे वळवण्यात आली. मात्र, शहाड पूल जवळ पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होता. याचा फटका वाहन चालकांना चांगलाच बसला होता.

याबाबत वाहतूक कल्याण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोविंद गंभीरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ''अनेक ठिकाणी रस्त्यावरील पाणी ओसरत असले तरी पत्रिपुल, दुर्गाडी पूल येथील पडलेले खड्डे यामुळे वाहतूक संथगतीने सूरु आहे. तर आता शहाड पूला जवळ पाणी साचल्याने मोहना रोड वरील वाहतूकही संथगतीने सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली .''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic disrupted due to water collapse near Shahda Bridge in Kalyan