कल्याण - रस्त्यांच्या कामांमुळे वाहतूककोंडी, पर्यायी मार्ग वापरण्याचा आदेश

रविंद्र खरात 
शुक्रवार, 4 मे 2018

कल्याण : डोंबिवलीमधील स्टार कॉलनी जवळील धोकादायक पूल तोडून नव्याने पूल बनविण्याच्या कामाला एक महिना, तर कल्याण पूर्व मधील रस्ते बनविण्याच्या कामाला पंधरा दिवस लागणार असल्याने त्या भागात वाहनांना प्रवेश बंदी केली असून पर्यायी मार्ग वाहतूक विभागाने जाहीर केले आहेत. त्या मार्गाने इच्छित ठिकाणी जाण्याचे आवाहन कल्याण पूर्व वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतेज जाधव यांनी केले आहे.

कल्याण : डोंबिवलीमधील स्टार कॉलनी जवळील धोकादायक पूल तोडून नव्याने पूल बनविण्याच्या कामाला एक महिना, तर कल्याण पूर्व मधील रस्ते बनविण्याच्या कामाला पंधरा दिवस लागणार असल्याने त्या भागात वाहनांना प्रवेश बंदी केली असून पर्यायी मार्ग वाहतूक विभागाने जाहीर केले आहेत. त्या मार्गाने इच्छित ठिकाणी जाण्याचे आवाहन कल्याण पूर्व वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतेज जाधव यांनी केले आहे.

 

कल्याण पूर्व कोळशेवाडी वाहतूक पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या डोंबिवली पूर्व सागाव मानपाडा रस्त्यावरील स्टार कॉलनी येथील नाल्यावरील जुना पूल धोकादायक झाल्याने तो तोडून नव्याने बांधण्याचे काम गुरुवार ता 3 मे पासून सार्वजनिक बांधकाम ठाणे विभागाने सुरू केले असून हे काम पूर्ण होण्यास एक महिना कालावधी लागू शकतो त्यामुळे त्या परिसरात वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली असून ते काम पूर्ण होईपर्यंत पर्यायी मार्ग - ट्रक, टेम्पो, बसेस इत्यादी चारचाकी या त्यापेक्षा जास्त चाके असलेली वाहने, शनी मंदिरा समोरून भोपर देसले पाडा नांदवली मार्गे इच्छित स्थळी जातील. 

हलकी वाहने सागाव साईबाबा मंदिर येथून डावे वळण घेवुन हनुमान मंदिर पी अँड कॉलनी गांधी नगर जकात नाका डोंबिवली स्टेशन मार्गे कल्याणच्या दिशेने इच्छित स्थळी जातील. 

डोंबिवली स्टेशन कडून मानपाडा रोड ने मानपाडा चौकाचे येणारी वाहने जकात नाक्याच्या अगोदर असलेल्या नाक्यावर डावे वळण घेवून आईस फेक्ट्रिरी अभिनव विद्या मंदिर समोरून डी एन एस चौक कल्याण शिळ रोडने अथवा एम आय डी सी परिसरातून इच्छित स्थळी जातील.

शिळ कल्याण मार्गावरून मानपाडा रोडने मानपाडा चौक मार्गे डोंबिवली स्टेशन दिशेने येणाऱ्या कल्याण, डोंबिवली मनपा, नवी मुंबई मनपाच्या बसेसना मानपाडा चौकात व चार रस्ता येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. 

बसेस शिळ रोडने सुयोग जक्शन येथे डावे वळण घेऊन पेंढारकर कॉलेज घारडा सर्कल टिळक चौक मार्गे डोंबिवली स्टेशन ये जा करतील. मानपाडा रोडवरील साईबाबा मंदिर, सांगाव चौक मार्गे पी अँड कॉलनीच्या दिशेने जाणारा रस्ता सांगाव चौक ते बाळाराम दर्शन बिल्डिंग पर्यंत अरुंद असल्याने पी एन टी कॉलनी कडे जाणेस एक दिशा मार्ग करण्यात आला असून उलट दिशेने येणारी वाहने पी अँड कॉलनी  कडून मानपाडा दिशेने पुढे जकात नाका नांदवली टेकडी रोडने शनि मंदिर रोडने इच्छित स्थळी जातील.

कल्याण पूर्व मधील नेतवली नाका ते चक्की नाका या परिसरात सिमेंट रस्ता आणि नाला बांधण्याचे काम हाती घेतल्याने वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात आले असून हे काम 15 दिवसात पूर्ण होण्याची शक्यता पाहता कल्याण पश्चिम पूर्वेला पत्रीपूल मार्गे नेतवली नाका ऐवजी सूचक नाका मार्गे पुढे जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रस्ते आणि पुलाचे काम पाहता पर्यायी मार्ग जाहीर केले असून त्याचा वापर करावा , आणि शिस्तीचे पालन करून वाहतूक विभागाला सहकार्य कोळशेवाडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतेज जाधव यांनी केले आहे . 

Web Title: traffic due to work on road used optional way in kalyan