दिवाळी खरेदीच्या गर्दीमुळे कोपरखैरणेत वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

कोपरखैरणे - दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केल्यामुळे रा. फ. नाईक चौक ते तीन टाकी परिसर गर्दीने फुलला आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे वाहतूक कोंडी सोडवणे पोलिसांना जिकीरीचे झाले आहे.

कोपरखैरणेतील रा. फ. नाईक चौक ते तीन टाकी हा रस्ता पायी केवळ पाच ते सात मिनिटांचा आहे. इतर वेळीही या विभागात वाहतूक कोंडी वारंवार होतच असते; मात्र सध्या दिवाळी खरेदीच्या गर्दीमुळे येथून मोटारीने जाण्यासाठी 20 मिनिटे ते अर्धा तास लागत आहे. वाहन पार्किंगसाठी जागा नसल्याने दुहेरी तिहेरी पार्किंग होत आहे. येथील पदपथ पार्किंगने व्यापले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. रा. फ. नाईक चौकातील डी मार्टमध्येही ग्राहक मोठ्या प्रमाणात येत असल्याने येथे वाहनांची मोठी गर्दी असते. या विभागात नो पार्किंग असूनही येथे वाहने पार्क केली जातात. याशिवाय येथे बेकायदा रिक्षा स्टॅण्ड असल्यामुळे या वाहतूक कोंडीत आणखी भर पडते. यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांची गैरसोय होते.

Web Title: Traffic jam because diwali festival shopping