मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चारोटी टोल नाक्यावर वाहतूक कोंडी; वाहतूक प्रशासनाचे दूर्लक्ष

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चारोटी टोल नाक्यावर वाहतूक कोंडी; वाहतूक प्रशासनाचे दूर्लक्ष

कासा - दिवाळी जवळ येताच मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागे करोनाच्या प्रादुर्भावात अनेक महिने महामार्ग शुकशुकाट होता.लॉक डाऊन  शिथिल होताच महामार्गावर वाहने निघाली.

सद्या तर सकाळच्या वेळी मुंबईहून गुजरात कडे जाणाऱ्या महामार्गावर चारोटी टोल नाक्यावर मोठी लाईन लागते.वाहतूक कोंडी होते.  दिवाळी सणा निमित्त मुंबई ठाणे येथुन अनेक प्रवासी गुजरात ,राजस्थान येथे जात असल्याने ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडीत अडकल्याने प्रवासी संतप्त होत आहेत.
या बाबतीत टोल अधिकारी फाटक यानी सांगितले की ठाणे, मुंबई येथील अनेक मोठी वाहने,कंटेनर ,मालवाहू गाड्या या संध्याकाळी च्या वेळी मुंबईतून निघून महामार्गावर हॉटेल ,धाब्यावर थांबतात,सकाळी लवकर गुजरात राजस्थान कडे जाण्यासाठी निघतात त्यामुळे सद्या वाहतूक कोंडी होत आहे,आम्ही टोल नाक्यावर कर्मचारी संख्या वाढविली असून सी,सी,कॅमेरा द्वारे लक्ष ठेऊन आहोत.त्यात  अजूनही काही वाहन चालक फास्टटॅग च्या गोंधळात आहेत, रिचार्ज संपलेला असतो ते न पाहता वाहने नेत असतात त्या मुळे काही वेळा कोंडी होते.

काही दिवस झाले चारोटी टोल नाक्यावर सकाळच्या व संध्याकाळच्या वेळी मोठी गर्दी असते,आमचा तास दोन तास या मध्ये वेळ जातो तरी सणा सुदीच्या काळात  टोल कर्मचारी व लेन वाढवाव्यात व वाहतूक कोंडी टाळावी,
सुखबिर सिंह-
वाहन चालक,

Traffic jam at Charoti Toll Naka on Mumbai Ahmedabad Highway

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com