कळंबोली-नावडे मार्गावर वाहतूक कोंडी 

कळंबोली-नावडे मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्‍याने प्रवाशांना निश्‍चितस्‍थळी जाण्यास उशीर होतो.
कळंबोली-नावडे मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्‍याने प्रवाशांना निश्‍चितस्‍थळी जाण्यास उशीर होतो.

पनवेल : कळंबोली ते नावडे फाटादरम्यान दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे फक्त दीड ते दोन किलोमीटरच्या प्रवासाकरीता अर्धा ते पाऊण तास वेळ लागत असल्याने वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या पनवेल-मुंब्रा मार्गावर प्रवास करण्याकरिता सर्वच प्रकारच्या वाहनांना टोल भरणे बंधनकारक आहे. रस्त्याची देखभाल करण्याची जबाबदारी असलेल्या कंपनीकडून रोहिंजण येथील टोलनाक्‍यावर सक्तीने टोल वसुली केली जाते; मात्र कळंबोली ते रोडपालीदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा करण्यात येणारी अवजड वाहनांची पार्किंग, खड्डे पडलेले रस्ते, रोडपाली फुडलॅन्ड चौकात असलेली सिग्नल यंत्रणा, बौद्धवाडी जवळील कसाडी नदीवरील अरुंद पूल, नावडे वसाहती समोर रस्त्यावर पडलेले भले मोठे खड्डे आणि त्या पुढे नावडे फाटा येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे निर्माण होणाऱ्या अडथळ्यामुळे या भागातून प्रवास करताना येणारे अडथळे पार करून परत टोल भरावा लागत असल्याने वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत.

वाहतूक कोंडीचा फटका तळोजा औद्योगिक वसाहतीत जाणारे कामगार तसेच पनवेल परिसरात शिकण्याकरिता येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही बसत असून, कामाच्या ठिकाणी वेळेत पोहचण्यासाठी घरातून तासभर आधी बाहेर पडावे लागत असल्याची माहिती औद्योगिक परिसरात काम करणारे संतोष मोहिते यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com