Traffic in Malsege Ghat likely to be smooth till evening
Traffic in Malsege Ghat likely to be smooth till evening

माळशेज घाटातील वाहतूक सायंकाळपर्यंत सुरळीत होण्याची शक्यता

सरळगांव : माळशेज घाटात कोसळलेल्या दरडी (राडारोडा) हटविण्याचे काम दुसऱ्या दिवशीही सूरू आहे. पाऊस व धुके असल्याने सलग पणे काम होत नसल्याने आजही घाटातील वाहातूक सूरू होणार नसल्याची माहीती कल्याण प्रांत अधिकारी प्रशांत उकिरडे यांनी दिली. पावसाने उघाड दिल्यास सायंकाळपर्यंत घाटातील वाहातूक सूरू होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. 

मंगळवारी (ता 21) ऑगस्ट पहाटे 2.30 वाजता माळशेज घाटात दरड कोसळल्याने एक ट्रक चालक जखमी झाला होता. घाटात पडणारा पाऊस, धुके यामूळे रस्त्यावर पडलेला मलमा हटविण्याच्या कामात अडथळा होत होता. यासाठी काल रात्री 7-8 वाजेपर्यंत मलमा काढण्याचे काम सूरू होते. या नंतर मलमा काढण्याचे काम बंद करण्यात आले. पूर्ण एक दिवस घाटातील वाहातूक बंद करण्यात आली होती. यामुळे घाटाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घाट वाहतुकीसाठी दोन दिवस खूला होणार नसल्याने अनेक वाहान चालकांनी मागे फिरून शहापुर-नाशिक मार्गे जाणे पसंत केले. तर काही वाहान चालकांनी आज नाही तर उद्या घाट वाहातूक सूरू होईल या आशेवर रस्त्यांतील ढाब्यांवर मूक्काम करणे पसंत केल्याचे दिसून येत होते. मंगळवारी सूरू करण्यात आलेले मलमा काढण्याचे काम रात्री बंद करण्यात आले. नंतर दूसऱ्या दिवशीही पाऊस व धुके असल्याने सकाळी काम सूरू होऊ शकले नाही ते काम 11 वाजता सूरू करण्यात आले.   

माळशेज घाटात मंगळवारी पहाटे 2.30 वाजता घाटात दरड कोसळल्याची खबर मिळताच तातडीने घटना स्थळी दाखल झाल्या नंतर रस्त्यावर पडलेला राडारोडा मोठ्या प्रमाणात असल्याने निदर्शनास आले. वेळ न घालविता तातडीने जसीबीच्या सहाय्याने मलमा  काढण्याचे काम सूरू केले. मात्र सतत पडणारा पाऊस व धुके मोठ्या प्रमाणात असल्याने मलमा काढण्याचे काम सलग होत नसल्याने पहिल्या दिवशी मलमा काढण्याचे काम पूरे होऊ शकले नाही. 

आज पावसाने उघडा दिल्यास काम सुरळीत सूरू राहिल्यास गुरुवारी घाटातील वाहातूक सूरू करण्याचा निर्णय घेतला जाईल.
-प्रशांत उकिरडे, प्रांत अधिकारी कल्याण. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com