दोन तासांसाठी पाच तास रखडपट्टी!

किशोर कोकणे
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

ठाणे - वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीचा फटका मुंबई आणि ठाण्यातील एसटीच्या प्रवाशांना बसत आहे. वाहतूक कोंडीत एसटी प्रवाशांना दोन तासांच्या अंतराकरिता पाच-सहा तास रखडावे लागत आहेत. वसई, विरार, बोरिवली आणि भाईंदरहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या एसटी प्रवाशांना याचा अधिक फटका बसत आहे. या कोंडीमुळे चालक-वाहकही हैराण झाले आहेत. 

वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीसाठी येथील अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ही वाहने भिवंडीमार्गे वळवण्यात आली आहेत; मात्र या मार्गावर रोजच वाहतुकीत बदल होत असल्याने रात्री बोरिवली किंवा वसई-विरारच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. 

बोरिवली आणि भाईंदर मार्गावरील शिवशाही आणि साध्या बसगाड्यांचीही हीच स्थिती आहे. वर्सोवा पुलावर छोट्या वाहनांसाठी एक मार्गिका सुरू असते. त्यामुळे ती मोकळी ठेवण्यासाठी बोरिवली किंवा भाईंदरहून ठाण्याकडे येणाऱ्या गाड्यांची एक मार्गिका काही वेळ बंद करण्यात येते; मात्र रात्री ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असते. त्यामुळे १० ते १५ मिनिटेही एखादी मार्गिका बंद राहिली तरी दोन कि.मी.पर्यंत वाहनांच्या रांगा लागतात.

नेमके काय होते? 
वसई-विरारहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या अवजड वाहनांना भिवंडी मार्गावरून सोडण्यात येत आहे; मात्र यासाठी पाच ते सहा तास लागत असल्याने या मार्गावरून एसटीने प्रवास करणारे अनेक जण रेल्वेने येत आहेत. काही प्रवासी विरार-वसईहून चिंचोटीपर्यंत प्रवास करतात. त्यानंतर चिंचोटीहून पुन्हा फाऊंटन हॉटेलपर्यंत शेअर रिक्षाने येतात. फाऊंटन हॉटेलहून पुन्हा खासगी वाहनांनी किंवा बोरिवली-भाईंदरहून भरून येणाऱ्या बस पकडाव्या लागतात. 

एसटी चालक-वाहक हैराण
एसटीच्या चालक-वाहकांना दिवसाला बसच्या ९० कि.मी.च्या फेऱ्या पूर्ण कराव्या लागतात; मात्र वाहतूक कोंडीमुळे पाच-सहा तास बस चालवाव्या लागत असून टार्गेटही पूर्ण होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Traffic in Mumbai