कोरोनाच्या धास्तीने मुंबईतील वर्दळ रोडावली 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 मार्च 2020

कोरोना विषाणूच्या भीतीमुळे शहर व उपनगरांतील नागरिक प्रवास टाळत आहेत. त्यामुळे आठवड्यातील पहिल्याच दिवशी नागरिकांच्या गर्दीत मोठी घट दिसली. मध्य, हार्बर व पश्‍चिम रेल्वेवरील स्थानके आणि लोकलमध्ये सकाळी कामावर जाणाऱ्यांची काही प्रमाणात गर्दी होती.

मुंबई : कोरोना विषाणूच्या भीतीमुळे शहर व उपनगरांतील नागरिक प्रवास टाळत आहेत. त्यामुळे आठवड्यातील पहिल्याच दिवशी नागरिकांच्या गर्दीत मोठी घट दिसली. मध्य, हार्बर व पश्‍चिम रेल्वेवरील स्थानके आणि लोकलमध्ये सकाळी कामावर जाणाऱ्यांची काही प्रमाणात गर्दी होती. दुपारी १२ पासून मात्र प्रवाशांची संख्या रोडावली. रस्त्यांवरही फारशी वर्दळ नव्हती; त्यामुळे टॅक्‍सी सेवेला फटका बसला.

मोठी बातमी ः महामुंबई लॉकडाऊनच्या दिशेने

राज्यातील कोरोना बाधित रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिक घराबाहेर पडणे टाळत असल्याने लोकलमधील गर्दी कमी झाली आहे. रस्त्यांवरील वाहनांची संख्याही घटली असून, प्रवासी मिळत नसल्याने टॅक्‍सी सेवेला फटका बसला आहे. आठवड्यातील पहिल्या दिवशी लोकल भरभरून वाहतात; मात्र हा सोमवार अपवाद ठरला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (सीएसएमटी) दुपारच्या वेळेत तुरळक प्रवासी होते. 

महत्वाची बातमी ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर D-Mart बद्दल महत्त्वाची बातमी 

सीएसएमटी परिसरात नियमित साफसफाई केली जात असल्याचे मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी ए. के. जैन यांनी सांगितले.

मोठी बातमी ः मुंबईच्या लोकल ट्रेन्स, मेट्रो आणि बसेस आठवडाभरासाठी होणार बंद ?

बहुतेकांच्या तोंडावर मास्क
बहुतेक प्रवाशांनी तोंडावर मास्क बांधल्याचे दिसत आहे. काही जण तोंडावर रुमाल बांधून वावरत आहेत. कोरोना विषाणूची बाधा होऊ नये म्हणून नागरिक काळजी घेत आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: traffic in mumbai reduced because of corona outbreak