पत्रकारास अरेरावी करणाऱ्या वाहतूक पोलिसाची बदली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 जानेवारी 2019

वसई : पालघर येथील "सकाळ'चे बातमीदार पी. एम. पाटील यांच्याशी अरेरावी करणाऱ्या वाहतूक पोलिस कर्मचारी वसावे यांची अखेर विभागीय चौकशी लावण्यात आली असून, अपर पोलिस अधीक्षक योगेश चव्हाण यांनी त्यांची बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. अपर पोलिस अधीक्षकांनी वसावे यांची बदली नियंत्रण कक्षात केली आहे. 

या प्रकाराबाबत पोलिस अधीक्षक चव्हाण यांची शनिवारी पत्रकारांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. याबाबत पत्रकारास वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याने केलेल्या धक्काबुक्कीचा सारा प्रकार कथन करण्यात आला. या वेळी मराठी पत्रकार परिषदेचे पालघर जिल्हाध्यक्ष संजीव जोशी, सचिव हर्षद पाटील, नीरज राऊत, हितेन नाईक, संतोष पाटील, समीर मणियार यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

याप्रकरणी वसावे यांची विभागीय चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. पत्रकाराला केलेल्या धक्काबुक्कीचा संपूर्ण पालघर जिल्ह्यातून निषेध करण्यात येत आहे. 
 
Web Title: Traffic Police Transferred who threatens the journalist